गुजरात टायटन्सने सनराजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. हैदराबादने गुजरातला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 3 विकेट्स गमावून 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मिलरने नाबाद 44 धावा केल्या. तर साई सुदर्शन याने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर कॅप्टन शुबमन गिल याने विजयात 36 धावांचं योगदान दिलं. गुजरातचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला.
गुजरातकडून ओपनर जोडी ऋद्धीमान साहा याने 25 आणि कॅप्टन शुबमन गिल याने 36 धावा केल्या. साई सुदर्शन याने खऱ्या अर्थाने इमपॅक्ट प्लेअर म्हणून छाप सोडली. साईने 36 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 षटकारसह 45 धावांची निर्णायक खेळी केली. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि विजय शंकर या जोडीने गुजरातला विजय मिळवून दिला. मिलरनने 27 बॉलमध्ये 2 सिक्स आणि फोरसह 44 रन्स केल्या. तर विजय शंकरने 11 बॉलमध्ये 14 धावा केल्या. तर हैदराबादकडून शहबाज अहमद, मयंक मार्कंडे आणि कॅप्टन पॅट कमिन्स या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी सनरायर्स हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबई विरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करुन आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना गुजरातच्या फलंदाजांना पद्धतशीर रोखलं. गुजरातने त्यांना मोठी खेळी करण्यापासून दूरच ठेवलं. हैदराबादच्या टॉप 7 फलंदाजांनी किमान 15+ धावा केल्या. मात्र त्यापैकी एकालाही 30 पार मजल मारता आली नाही. अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा या दोघांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. तर मोहित शर्मा याने 3 विकेट्स घेतल्या.
गुजरातचा दणदणीत विजय
M. O. O. D! ☺️ 🤝@gujarat_titans put up a fine show to seal a 7⃣-wicket win 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/hdUWPFsHP8 #TATAIPL | #GTvSRH pic.twitter.com/AUYYLZ3i0h
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.