आयपीएलमधील 17 वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मैदानात गुजरातने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही होमग्राउंडचा फायदा घेण्यासाठी आतुर असेल. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी 2 सामनयात विजय मिळवला आहे. त्यामुळे 4 गुण आणि -0.738 इतका नेट रनरेट आहे. तर पंजाबने तीन पैकी फक्त एक सामना जिंकत दोन गुणांची कमाई केली आहे. तर नेट रनरेट +0.337 इतका आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात मुंबईला 6 धावांनी पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने गुजरातचा 63 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात कमबॅक करत गुजरातने हैदराबादला 7 विकेट्स राखून पराभूत केलं. दुसरीकडे, पंजाबने दिल्लीला पहिल्या सामन्यात 4 गडी राखून पराभूत केलं होतं. त्यानंतर बंगळुरु आणि लखनौकडून पराभवाची चव चाखली आहे.
गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आयपीएल स्पर्धेत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यात गुजरात टायटन्सने 2 वेळा, तर पंजाब किंग्सने एकदा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सची पंजाबविरुद्ध 190 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर पंजाब किंग्सची गुजरात विरुद्द 189 ही सर्वोत्तम खेळी आहे. दुसरीकडे, अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजांना पूरक आहे. तर काळ्या रंगाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. तर लाल रंगाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उजवी ठरते.
गुजरात टायटन्स : वृद्धिमान साहा, शुबमन गिल (कर्णधार), डेविड मिलर, विजय शंकर, अझमतुल्लाह ओमरजाई, राहुल तेवतिया, राशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, दर्शन नळकांडे आणि मोहित शर्मा
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स नाणेफेकीनंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून कोणाला संधी द्यायची तो निर्णय घेतील. सामन्याच्या परिस्थिती आणि नाणेफेकीवर सर्वस्वी अवलंबून असणार आहे. पहिल्यांदा गोलंदाजी आली तर प्लेइंग 11 मधून गोलंदाज वापरले जातील. त्यानंतर फलंदाजीवेळी गोलंदाजाला पर्याय म्हणून इम्पॅक्ट प्लेयरला संधी मिळेल.