IPl 2024 : शुबमन गिल कॅप्टन, तर ‘हे’ खेळाडू हार्दिकची जाग भरून काढणार?
IPL 2024 | आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात संघासाठी अनेक अडचणी आहेत. मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. तर हार्दिक पंड्याची जागा शुबमनला दिली मात्र त्याची कमतरता कोण भरून काढणार? जाणून घ्या.
-
-
आयपीएलच्या 17 मोसमाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. येत्या 22 मार्चला आरसीबी आणि सीएसके या दोन संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. गेल्यावर्षी फायनलमध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्स संघासमोर यंदा मोठा प्रश्न असणार आहे.
-
-
आयपीएल आधी मुंबई इंडियन्सने ट्रेडिंग विन्डोमध्ये हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. हार्दिकला घेतलंच नाहीतर त्याला कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली.
-
-
गुजरात संघाला पहिल्याच वर्षी चॅम्पियन करणाऱ्या हार्दिक पंड्याचा मोठा वाटा होता. पंड्याने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. दुसऱ्या वर्षीही फायनलमध्ये गुजरात संघाचा पराभव झाला होता. आता हार्दिकच्या जागी शुबमन गिल याच्याकडे जबाबदारी सोपवली गेली होती.
-
-
शुबमन गिलकड आणि कोच आशिष नेहरा यांच्यासमोर मोठ्या अडचणी असणार आहेत. हार्दिकची जागा भरून काढणारा खेळाडू नाही. पंड्या मोठा एक्स फॅक्टर ठरला होता. कोणत्याही नंबरवर तो फलंदाजीसाठी यायचा. त्यामुळे आता त्याची जागा भरून काढणं इतकं काही सोपं नसणार.
-
-
गुजरा टायनटन्स संघाकडे सीनिअर आणि ज्युनिअर खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये विजय शंकर आणि राहुल तेवतिया यांचा समावेश आहे. हे खेळाडू छाप सोडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गिलकडे स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध करण्यासाठी मोठी संधी असणार आहे.