IPL 2024 : कर्णधारपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना स्पष्टच सांगितलं की…

| Updated on: Mar 05, 2024 | 3:10 PM

इंडियन प्रीमियर लीग स्पर्देसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हाती घेतली आहे. जेतेपदासाठी हार्दिक पांड्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्यावर हार्दिक पांड्याने उत्तर दिलं आहे.

IPL 2024 : कर्णधारपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना स्पष्टच सांगितलं की...
IPL 2024 : मुंबई इंडियन्स कॅप्टन्सी घेतल्यानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच उघडपणे बोलला, असं वाटते की...
Follow us on

मुंबई : 22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज असून जेतेपदासाठी रणनिती आखत आहेत. मुंबई इंडियन्सनेही हार्दिक पांड्याच्या हाती कर्णधारपदाची सूत्र सोपवली आहेत. या संघातूनच हार्दिक पांड्याने आयपीएल खेळण्यास सुरुवात केली होती. दोन वर्षे गुजरात टायटन्सची धुरा सांभाळल्यानंतर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. इतकंच काय तर रोहित शर्माकडील सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या प्रवासाबाबत, टीमसोबत असलेलं नातं आणि फॅन्सबाबत सर्वकाही सांगितलं. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स माध्यमातून आयपीएल खेळण्यास सुरुवात केली होती. आता रोहित शर्माकडील सूत्र हार्दिकच्या हाती सोपवल्यानंतर एका वादाला फोडणी मिळाली आहे. दरम्यान स्टार स्पोर्टशी बोलताना हार्दिक पांड्याने सांगितलं की, दोन वर्षानंतर घरी परतल्यानंतर आनंद झाला आहे.

“चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर असंत वाटतं की पुन्हा एकदा सर्वकाही तिथेच आलं. जिथून सुरुवात केली होती, तिथेच परतलो. बरोड्यात एक तरुण म्हणून मुंबईसाठी केला प्रवास खरंच खूप छान आहे. शहराने खूप काही शिवकलं. या शहरातील प्रेम आणि शिक्षण अमूल्य आहे. मुंबई कायम आणखी चांगलं बनण्यासाठी आव्हान देते. आता आयपीएलच्या माध्यमातून दोन वर्षांनी घरी परतलो आहे.”, असं हार्दिक पांड्याने सांगितलं.

रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याच्या हाती दिलं. यावरून काही चाहते नाराज आहेत. त्यावर हार्दिक पांड्याने सांगितलं की, मला विजयाकडे प्रवृत्त करण्यासाठी माझ्या चाहत्यांचा असाच पाठिंबा हवा आहे. निश्चिंत रहा, मी एक रोमांचक हंगाम सुनिश्चित करेन ज्याचा सर्वांना आनंद मिळेल. हा असा प्रवास आहे ज्याचा आपण सर्व एकत्र आनंद घेऊ शकतो.

हार्दिक पांड्याने आयपीएल 2015 चा उल्लेख करताना सांगितले की, “त्या वर्षामुळे मी आज इथे बसलो आहे. ते वर्ष कायम स्मरणात राहील. बरोड्याहून आल्यानंतर मला 2015 ची आयपीएल आठवते. तो माझ्यासाठी आयुष्य बदलणारा अनुभव होता. माझ्या करिअरमधली ती सर्वात खास गोष्ट होती. मुंबई इंडियन्सकडून अनुभवी खेळाडूंमध्ये खेळणे स्वप्नवत होते. नॉकआऊट सामन्यांमध्ये योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. बाद फेरीदरम्यान दोन सामनावीर जिंकणे हा सर्वात खास अनुभव होता.”