आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठी आता जबरदस्त चुरस पाहायला मिळत आहे. काही संघांचा प्लेऑफचा रस्ता सरळ साधा आहे. तर काही संघांना एकमेकांवर अवलंबून प्लेऑफचं मार्ग गाठायचा आहे. साधारणत: आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 16 गुण मिळवणाऱ्या संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचं सांगायचं तर गुजरात टायटन्सचे 20, चेन्नई सुपर किंग्सचे 17, लखनौ सुपर जायंट्सचे 17 आणि मुंबई इंडियन्सचे 16 गुण होते. त्यामुळे 16 गुण मिळवणारा संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं आयपीएल प्लेऑफमधलं स्थान जवळपास पक्कं झालं आहे. सध्याच्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सने 16 गुण मिळवले आहेत. तर दुसऱ्या स्थानापासून पाचव्या स्थानावर असलेल्या कोलकाता, हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली या संघांचे 10 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स 8 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स प्रत्येकी 6 गुणांसह अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. आरसीबी संघ 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0261 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला अजून पाच सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्सने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील आणि प्लेऑफमधलं स्थान निश्चित होईल. पण एखाद सामन्यात पराभव झाला तर मात्र प्लेऑफचं गणित किचकट होईल. मुंबई इंडियन्सला जर तर वर अवलंबून राहावं लागेल. इतकंच काय तर मुंबई इंडियन्सला नेट रनरेटही सांभाळावा लागेल.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मोहम्मद नबी, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, कुमार कार्तिकेय, ल्यूक वुड, हार्विक देसाई, अर्जुन तेंडुलकर, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, क्वेना मफाका.