IPL 2024 : पाच सामने गमवूनही आरसीबी कशी पोहोचणार प्लेऑफमध्ये? जाणून घ्या गणित
आयपीएल 2024 स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. प्लेऑफसाठीची चुरस आणखी रंगतदार वळणावर येत चालली आहे. तळाशी असलेल्या संघांची धाकधूक वाढली आहे. अशीच काहीशी परिस्थिती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची आहे. सहा पैकी पाच सामने गमवल्याने प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. असं असलं तरी मार्ग काही बंद झालेला नाही.
1 / 8
आयपीएलचं 17वं पर्व आरसीबीसाठी वाईट असल्याचं सुरुवातीच्या सामन्यातून दिसून आलं आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही पराभव काही पाठ सोडत नाही. आतापर्यंत सहा पैकी पाच सामने गमवल्याने प्लेऑफची वाट बिकट झाली आहे. पुढे काय करावं लागेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात गणित (Photo : BCCI/IPL)
2 / 8
आरसीबी संघ दोन गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघाला खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. आरसीबीची साखळी फेरीतील एकूण 8 सामने उरले आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. (Photo : BCCI/IPL)
3 / 8
आरसीबीला प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी उर्वरित आठ सामन्यांपैकी 7 सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. सात सामने जिंकल्यास एकूण 16 गुण होतील आणि प्लेऑफचं गणित सुटेल. (Photo : BCCI/IPL)
4 / 8
आरसीबीला 2022 च्या आयपीएल स्पर्धेत 16 गुण मिळाले होते आणि प्लेऑफमध्ये पात्र ठरला होता. 2023 आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या बाबतही असंच झालं होतं. 16 गुण मिळवत प्लेऑफमध्ये धडक मारली होती. (Photo : BCCI/IPL)
5 / 8
आरसीबीने उर्वरित 8 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला तर एकूण 18 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफमध्ये सहज एन्ट्री करेल. पण आरसीबीने 8 पैकी 7 सामने जिंकले तरी 16 गुणांसह प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. (Photo : BCCI/IPL)
6 / 8
आरसीबीने उर्वरित 8 पैकी 2 सामने गमावले तर प्लेऑफचा मार्ग कठीण आहे. कारण प्लेऑफमध्ये सहज एन्ट्रीसाठी काहीही 7 सामने जिंकावेच लागतील. अन्यथा सर्वकाही जर तर वर अवलंबून राहील. (Photo : BCCI/IPL)
7 / 8
मुंबई इंडियन्सविरुद्ध 7 विकेट्स आणि 27 धावांनी पराभव झाल्याने आरसीबीच्या नेट रनरेटवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जर तरचं गणित आलं तर नेट रनरेटही तितका चांगला असणं गरजेचं आहे. (Photo : BCCI/IPL)
8 / 8
आरसीबीला आता पुढे सामना जिंकणंच नाही तर नेट रनरेटही चांगला राखण्याचं आव्हान आहे. तर आणि तरच आरसीबीचं प्लेऑफचं मार्ग मोकळा होईल. (Photo : BCCI/IPL)