IPL 2024 : हे संघ जिंकले तर आरसीबी, चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान येणार संपुष्टात; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

| Updated on: May 13, 2024 | 2:49 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र बदलताना दिसत आहे. आतापर्यंत साखळी फेरीतील 62 सामने पार पडले असून 63वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. तत्पूर्वी गुणतालिकेत कोलकात्यानेच क्वॉलिफाय केलं आहे. तर इतर संघांचं अजूनही काही निश्चित झालेलं नाही.

IPL 2024 : हे संघ जिंकले तर आरसीबी, चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान येणार संपुष्टात; जाणून घ्या संपूर्ण समीकरण
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्सने क्वॉलिफाय केलं आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स हा संघ 16 गुणांसह प्लेऑफच्या वेशीवर आहे. असं असताना सहा संघांमध्ये उर्वरीत दोन जागांसाठी खऱ्या अर्थाने चुरस आहे. प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी सर्वाधिक मोठी संधी राजस्थान रॉयल्सकडे आहे. दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादकडे तितकीच संधी आहे. उर्वरित दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवल्यास प्लेऑफचा मार्ग मोकळा होईल. आता चौथ्या जागेसाठी बराच संघर्ष पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात विजयी संघ प्लेऑफच्या शर्यतीत राहील. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचेही 12 गुण आहेत. तर गुजरात टायटन्सचे 10 गुण प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. या दोन सामन्यात दोन्ही संघांना 16 गुण कमवण्याची संधी आहे. कोलकात्यानंतर राजस्थान रॉयल्सने एका सामन्यात विजय मिळवला तर 18 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचेल. तर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स 16 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहू शकतात. सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सशी होणार आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सने पुढील दोन्ही सामने जिंकले तर आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. म्हणजेच आरसीबीला पुढचा सामना जिंकूनही या दोन संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने हा सामना जिंकला तर 16 गुण होतील. मात्र मग सर्वकाही नेट रनरेटवर येऊन थांबेल. त्यामुळे हैदराबाद आणि लखनौ यांच्या सामन्यांच्या निकालावर आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याचं महत्त्व असणार आहे. हैदराबाद आणि लखनौ पुढच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला तर आरसीबीसोबत चेन्नई सुपर किंग्सला बाहेर पडावं लागेल.