Video : इशान किशनच्या अंगात आलं मलिंगाचं भूत, पाहा कुरळ्या केसांसह मैदानात काय केलं

| Updated on: Mar 15, 2024 | 4:39 PM

गेल्या काही दिवसांपासून इशान किशन बाबत अनेक चर्चा रंगल्या. इतकंच काय तर इशान किशनने बीसीसीआयच्या आदेशानाही केराची टोपली दाखवली. आता इशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Video : इशान किशनच्या अंगात आलं मलिंगाचं भूत, पाहा कुरळ्या केसांसह मैदानात काय केलं
Follow us on

मुंबई : इशान किशन भारतीय संघातील विकेटकीपर बॅट्समन आहे. पण दक्षिण अफ्रिका मध्यातच सोडून आल्याने त्याचे तारे फिरले. बीसीसीआयने त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. मात्र त्याकडे त्याने पाठ फिरवल्याने सेंट्रल काँट्रॅक्टमधून त्याला वगळण्यात आलं आहे. आता इशान किशन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रूजू झाला आहे. तसेच आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आता इशान किशनचा एक व्हिडीओ समोर आल आहे. यात इशान किशन स्पर्धेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. इतकंच काय तर त्याने गोलंदाजीतही आपला हात आजमावला आहे. मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाच्या शैली कॉपी करताना दिसला. इतक्या साऱ्या घडामोडी घडल्या असूनही इशान किशलला कोणतंही दु:ख वाटत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. इशान सर्वात आधी मलिंगासारखी हेअरस्टाईल केली.

मलिंगासारखा डोक्यात वीक घालताच त्याला त्याच्यासारखी गोलंदाजी करणं आवरलं नाही. लगेचच धाव घेत त्याच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी केली. त्यानंतर थोडा वेळ थांबला आणि लसिथ मलिंगाला बोलवलं. त्यानंतर मलिंगासोबत त्याच्या स्टाईलने गोलंदाजी केली. व्हिडीओत मलिंगाकडून पहिल्यांदा चेंडू घेतो. त्यानंतर त्या चेंडूला चुंबन घेतो आणि रनअप घेतो. त्याने चेंडू टाकताच मलिंगा जोराने हसताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्स विरोधात आहे. या सामन्यात इशान किशन एका विक्रमाला गवसणी घालू शकतो. इशान किशनने आतापर्यंत 91 सामन्यात 103 षटकार ठोकले आहेत. तर विरेंद्र सेहवागने 104 सामन्यात 106 षटकार मारले आहेत. इशान किशन गुजरातविरुद्ध 4 षटकार मारताच सेहवागला मागे टाकणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेल आघाडीवर आहे. त्याच्या नावावर 357 षटकार आहेत.

मुंबई इंडियन्स स्क्वॉड : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, विष्णु विनोद, मोहम्मद नबी, अर्जुन तेंडुलकर, रोमारियो शेफर्ड, शम्स मुलानी, नेहल वढेरा, गेराल्ड कोएत्झी, अंशुल कंबोज, नमन धीर, शिवालिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरनडॉर्फ, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा.