मुंंबई | क्रिकेट चाहत्यांना आगामी आयपीएल 2024 ची प्रतीक्षा लागली असून यंदाच्या आयपीएलमधील प्रदर्शनावर खेळाडूंची वर्ल्ड कपसाठी निवड होणार आहे. यंद टी-20 वर्ल्ड कप होणार असून टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड ही आयपीएलमधील कामगिरीवर केली जाणार आहे. यंदाच्या आयपीएलआधी सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि बॉलिवुडची स्टार अभिनेत्री कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.
बॉलिवुडधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली कॅटरिना आता क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कॅटरिना कैफची निवड झाल्याची खालीलायक माहिती समजत आहे. त्यामुळे आता सीएसके संघाची फॅन फॉलोविंग वाढताना पाहायला मिळणार आहे. मात्र सीएसकेकडून याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
कॅटरिना कैफही इतिहाद एअरवेजची ब्रँड ॲम्बेसेडर असून 2023 पासून ती जोडली गेली आहे. आता चेन्नई सुपर किंग्जने यूएईच्या राष्ट्रीय विमान कंपनीसोबत प्रायोजकत्व करार केला आहे. त्यासोबतच कॅतरिना कैफलाही ब्रँड एम्बेडर बनवले आहे. ब्युटी क्विन नुकतीच ‘मेरी क्रिस’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती आहे. विजय आणि कतरिना कैफचा चित्रपट 60 कोटींचा बजेट असलेला चित्रपट होता. मात्र बॉक्स ऑफिसवर इतका काही चालला नाही.