आयपीएलच्या 17 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा विस्फोटक ऑलराउंडर आंद्रे रसेल याने तडाखा दाखवला. आंद्रे रसेलने केकेआरकडून मोसमातील पहिल्या सामन्यात खेळताना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राक्षसी खेळी केली. आंद्रेने त्याची दहशत दाखवून दिली. आंद्रेने अखेरपर्यंत नाबाद राहत 25 बॉलमध्ये नाबाद 64 धावांची खेळी केली. तसेच 20 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने केलेल्या या खेळीमुळे केकेआरला 200 पार पोहचता आलं.
आंद्रे रसेल याने 2 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 20 बॉलमध्ये 250 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. आंद्रेच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 10 वं अर्धशतक ठरलं. विशेष म्हणजे रसेने हे अर्धशतकही सिक्स ठोकून पूर्ण केलं. रसेलने या अर्धशतकी खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तर रसेलने अर्धशतकानंतर 4 बॉलमध्ये एकूण 14 धावा जोडल्या. रसेलने 35 बॉलमध्ये 256 च्या स्ट्राईक रेटने 3 चौका आणि 7 सिक्ससह नॉट आऊट 64 धावा केल्या. तर रिंकू सिंह यानेही रसेलला दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली.
रिंकू सिंह याने 15 बॉलमध्ये 153.33 च्या स्ट्राईक रेटने 3 चौकारांसह 23 धावांची निर्णायक खेळी केली. रिंकू आणि आंद्रे या दोघांनी सातव्या विकेटसाठी 81 धावांची तोडू भागीदारी केली. तर त्याआधी फिलिप सॉल्ट याने 54 आणि रमनदीप सिंह याने 35 धावा जोडल्या. तर सुनील नरेन, वेंकटेश अय्यर आणि कॅप्टन श्रेयस अय्यर हे तिघेही अपयशी ठरले.
दरम्यान रसेलच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर केकेआरने हैदराबादसमोर विजयासाठी 209 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता केकेआरचे गोलंदाज या आव्हानाचा बचाव करतात की हैदराबाद हे टार्गेट पूर्ण करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आंद्रे रसेलची तोडू खेळी
Russell’s Muscles 💪
Andre Russell is hitting it out of park with ease 😮
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱
Match Updates ▶️ https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #KKRvSRH | @KKRiders pic.twitter.com/Od84aM2rMr
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.