IPL 2024 DC vs KKR : कोलकात्याचं दिल्लीसमोर 273 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

| Updated on: Apr 03, 2024 | 9:30 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकात्याने दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. सुनील नरीन आणि अंगरीश रघुवंशीने धडाकेबाज फलंदाजी केली. दोघांनी वेगवान अर्धशतकी खेळी केली.

IPL 2024 DC vs KKR : कोलकात्याचं दिल्लीसमोर 273 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 गडी गमवून 272 धावा केल्या आणि विजयासाठी 273 धावा दिल्या आहेत. नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्स यांच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फलंदाजांनी सार्थकी लावली. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 4.3 षटकात फिलिप सॉल्ट आणि सुनील नरीन या जोडीने 60 धावा केल्या होत्या. फिलिप सॉल्टने 12 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर सुनील नरीन आणि अंगरीश रघुवंशी या जोडीने कोलकात्याच्या गोलंदाजांची पिसं काढली. दोघांनी 104 धावांची भागीदारी केली. सुनील नरीनने 39 चेंडूत 7 चौकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. तर अंगरिश रघुवंशीने 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.

आंद्रे रसेलनेही या सामन्यात साजेशी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यरची साथ मिळाली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान आक्रमक खेळी करताना श्रेयस अय्यर बाद झाला. त्याला 11 चेंडूत 18 धावा करता आल्या. कोलकात्याचे फलंदाज आक्रमक खेळी करत असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला सात गोलंदाज काढण्याची वेळ आली. खलील अहमद, इशांत शर्मा, एनरिक नोर्तजे, रसिख दार सलाम, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श यांनी गोलंदाजी टाकली. दुसरीकडे, मधल्या फळीत आलेल्या रिंकू सिंहने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. रिंकू सिंहने 8 चेंडूत 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतूने 26 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती