आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघ 3 मे नंतर पुन्हा एकदा भिडणार आहेत. कोलकाताने 3 मे रोजी मुंबईचा घरच्या मैदानात पराभव केला होता. त्यामुळे आता मुंबईकडे या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. मुंबईचं या 17 व्या हंगामातून पॅकअप झालंय. तर कोलकाताला प्लेऑफमध्ये अधिकृत प्रवेशासाठी एकमेव विजयाची गरज आहे. अशात मुंबई विजय मिळवून वचपा घेणार की कोलकाता प्लेऑफचं तिकीट मिळवणारी पहिली टीम ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलकाता विरुद्ध मुंबई सामना शनिवारी 11 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
कोलकाता विरुद्ध मुंबई सामना ईडन गार्डन्स, कोलकाता येथे आयोजित करण्यात आला आहे.
कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
कोलकाता विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
कोलकाता विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजे राणा रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.
मुंबई इंडिन्यस टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.