IPL 2024 : आयपीएल 17 व्या हंगामाच्या वेळापत्रकात बदल, नक्की कारण काय?

| Updated on: Apr 02, 2024 | 4:38 PM

Ipl 2024 Updated Schedule : बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

IPL 2024 : आयपीएल 17 व्या हंगामाच्या वेळापत्रकात बदल, नक्की कारण काय?
IPL 2024 TROPHY
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात सोमवार 1 एप्रिलपर्यंत एकूण 14 सामन्यांचं आयोजन यशस्वीपणे पार पडलं. या 14 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स सर्वात यशस्वी तर मुंबई इंडियन्स अपयशी टीम ठरली आहे. राजस्थानने खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवलाय. तर मुंबईने पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. आयपीएलचा 15 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

बीसीसीआयने एकूण 2 सामन्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना हा 17 एप्रिल रोजी ईडन गार्डमध्ये नियोजित करण्यात आला होता. बदललेल्या वेळापत्रकानुसार, हा सामना आता एक दिवसआधी 16 एप्रिल रोजी होणार आहे. तर गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना हा 17 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार होता. मात्र आता हा सामना 16 एप्रिल रोजी होणार आहे. आयपीएलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने याआधी आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं 2 टप्प्यात वेळापत्रक जाहीर केलं होतं. पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांसाठीचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्याने सर्व चित्र स्पष्ट झालं. त्यामुळे बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं गेलं. त्यानुसार एकूण 75 सामने हे भारतातच खेळवण्यात येणार आहेत.

वेळापत्रकात बदल का?


भारतात आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या वेळेस तगडा पोलीस बंदोबस्त लागतो. तसेच आयपीएल सामन्यांसाठीही सुरक्षा यंत्रणेची गरज असतेच. अशात रामनवमी आणि सुरक्षेच्या कारणांमुळे सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

रामनवमी 17 एप्रिल रोजी आहे. या दिवशी कोलकाता पोलिसांनी सामन्याला सुरक्षा देण्यास नकार दिला. सामन्याचं आयोजन दुसऱ्या दिवशी करावं, असा सल्ला कोलकाता पोलिसांनी दिला. त्यानुसार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या 17 एप्रिलच्या सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.