आयपीएलच्या 17 व्या हंगमातील अंतिम सामन्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये किताबी लढत होणार आहे. अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. या सामन्याआधी पॅट कमिन्स आणि श्रेयस अय्यर या दोन्ही कर्णधारांचं फोटोशूट पार पडलं. या अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशात दोन्ही संघांसाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी चेपॉकमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला कोलकाताच्या खेळाडूंचा चेपॉक स्टेडियममध्ये जोरदार सराव करत होते. अशात पावसाने एन्ट्री घेतली. अचानक आलेल्या पावसामुळे नेट्स प्रॅक्टीस करणाऱ्या केकेआरच्या खेळाडूंची एकच धावाधाव झालेली पाहायला मिळाली. एकाएकी आलेल्या पावसाने केकेआरच्या खेळाडूंच्या सरावावर पाणी फेरलं. केकेआर खेळाडूंनी जे मिळेल ते घेऊन ड्रेसिंग रुमच्या दिशने धुम ठोकली. तर दुसऱ्या बाजूला ग्राउंड स्टाफ कव्हर्स घेत खेळपट्टी झाकण्यासाठी धावत गेले.
आता या पावसामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. सामन्याच्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्यास चाहत्यांचा हिरमोड होणार हे निश्चित आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यातही पावसाने विघ्न घातलं होतं. त्यामुळे आता या हंगामातील अंतिम सामन्यातही गेल्या मोसमाप्रमाणे पावसाने विघ्न घालू नये, इतकीच अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
चेपॉकमध्ये फायनलआधी पावसाची बॅटिंग
“🚨 Rain alert at Chepauk Stadium just before the IPL 2024 final between KKR and SRH tomorrow! 🌧️ Fingers crossed for clear skies for the big match! 🤞 #IPL2024Final #KKRvSRH” pic.twitter.com/WtkvWKHKTJ
— Hemant Bhavsar (@hemantbhavsar86) May 25, 2024
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि अल्लाह गझनफर.
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, उमरान मलिक आणि विजयकांत व्यासकांत.