आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह या जोडीने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह या दोघांनी स्फोटक खेळी केली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. केकेआरकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक धावा केल्या. आंद्रे रसेल याने 64 धावांची नाबाद वादळी खेळी केली. तर रिंकू सिंह याने आंद्रेला चांगली साथ देत 23 धावांचं योगदान दिलं. त्याआधी रमनदीप सिंह याने 35 धावांची खेळी केली. तर ओपनर फिलिप सॉल्ट याने 54 रन्स केल्या.
कॅप्टन श्रेयस अय्यर याने घोर निराशा केली. श्रेयस अय्यर याला भोपळाही फोडता आला नाही. वेंकटेश अय्यर 7 धावा करुन माघारी परतला. तर सुनील नरेन याने आपली विकेट गिफ्टमध्ये दिली. नरेन 2 धावांवर रन आऊट झाला. तर सनरायजर्स हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मयंक मारकांडे याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कॅप्टन पॅट कमिन्स याला 1 विकेट मिळाली.
आंद्रे रसेल- रिंकू सिंहचा झंझावात
End of Innings ‼️#KKR set a target of 209 courtesy Andre Russell and Rinku Singh 🎯#SRH chase starting 🔜
Follow the match ▶️https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/jCqTTQU5aT
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.