कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर याची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील निराशाजनक सुरुवात झाली आहे. श्रेयस अय्यर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध टीम अडचणीत असताना बेजाबदार शॉट मारुन कॅच आऊट झाला. श्रेयसला भोपळाही फोडता आला नाही. श्रेयसला आऊट करुन थंगारसू नटराजन याने सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये केकेआरला 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. नटराजनने श्रेयस अय्यर याला कॅप्टन पॅट कमिन्स याच्या हाती आऊट केलं. नटराजनच्याआधी वेंकटेश अय्यर 7 धावांवर बाद झाला.
श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखापतीमुळे 16 व्या हंगामात खेळता आलं नव्हतं. मात्र दुखापतीवर मात करत श्रेयस 17 व्या हंगामात परतला. श्रेयसला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आलं. श्रेयसकडून 1 वर्षानंतर अविस्मरणीय खेळीची अपेक्षा होती. मात्र श्रेयसने क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा केली. श्रेयस झिरोवर आऊट झाला. त्यामुळे केकेआर अडचणीत सापडली. त्यामुळे आता ओपनर फिलिप सॉल्ट, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह या फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. फिलिप सॉल्ट आणि सुनील नरीन ही ओपनिंग जोडी मैदानात आली. फिलिपने फटकेबाजी सुरु केली. फिलिपने दुसऱ्याच ओव्हरमध्ये मार्को जान्सेन याच्या बॉलिंगवर सलग 3 सिक्स ठोकले. मात्र पुढच्याच बॉलवर नॉन स्ट्राईक एंडवर सुनील नरेन बेजबाबदारपणे रन आऊट झाला. नरेनला 2 धावाच करता आल्या.
हैदराबादची जोरदार सुरुवात
Sunil Narine ✅
Venkatesh Iyer ✅
Shreyas Iyer ✅@SunRisers bowlers start off on a positive note 👌👌Follow the match ▶️https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/HHZvHDeFZ4
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.