आयपीएलच्या 17 व्या मोसमातील साखळी फेरीचं आयोजन यशस्वीपणे पार पडलं. त्यानंतर आता आज 21 मे पासून क्वालिफायर राउंडला सुरुवात होत आहे. एकूण 10 पैकी कोलकाता नाईट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या 4 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. आता या प्लेऑफमधील पहिल्या सामन्यात पहिले 2 संघ आमनेसामने असणार आहेत. कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यात ही लढत होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघांला फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. मात्र दोन्ही संघांचा पहिल्याच फेरीत अंतिम फेरी निश्चित करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळेल.
नियमानुसार, साखळी फेरीनंतर टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार चुरस असते. हैदराबादने यामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी राजस्थानला मागे टाकतं दुसरं स्थान निश्चित केलं. त्यामुळे कोलकातासह हैदराबादला 2 संधी मिळणार आहेत. कोलकाता विरुद्ध हैदराबाद क्वालिफायर 1 सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार आहे. दोन्ही संघ त्रयस्थ ठिकाणी खेळत असल्याने प्रतिकूल परिस्थिती असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा कस लागणार आहे.
श्रेयस अय्यर याच्याकडे कोलकाताच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर पॅट कमिन्स हैदराबादची धुरा सांभाळणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 23 मार्च रोजी आमनेसामने आले होते. कोलकाताने त्या सामन्यात हैदराबादवर मात केली होती. कोलकाताने हा सामना 4 धावांनी जिंकला होता. मात्र तो साखळी सामना होता. तर हा प्लेऑफमधील सामना आहे.
हा सामना जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळेल. पराभूत संघ एलिमिनेटर जिंकणाऱ्या विरुद्ध फायनलच्या तिकीटासाठी 2 हात करेल. राजस्थान विरुद्ध बंगळुरु यांच्यात 22 मे रोजी एलिमिनेटर होणार आहे. या सामन्यातील विजेता संघाचा सामना हा क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाविरुद्ध असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मनीष पांडे, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रीकर भारत, शेरफान रदरफोर्ड, दुष्मंथा चमीरा, अंगक्रिश रघुवंशी, साकिब हुसैन, सुयश शर्मा, अल्लाह गझनफर आणि चेतन साकरीया.
सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, अब्दुल समद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स , वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन आणि आकाश महाराज सिंग.