कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील क्वालिफायर 1 सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने विजयासाठी मिळालेलं 160 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून 13.4 ओव्हरमध्ये पूण केलं. केकेआरने या विजयासह 17 व्या हंगामाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. केकेआरची आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ ठरली. तर या पराभवानंतरही हैदराबादचं आव्हान कायम आहे. हैदराबाद साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने त्यांना फायनलमध्ये पोहचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. कॅप्टन श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर ही जोडी केकेआरच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर रहमानुल्लाह गुरुबाज आणि सुनील नरीन या दोघांनी चांगली साथ दिली.
नरीन आणि गुरुबाज या दोघांनी 44 धावांची सलामी भागीदाली केली. त्यांनतर गुरुबाज 23 धावा केल्या. त्यानंतर सुनील नरीन 21 रन्स करुन माघारी परतला. त्यामुळे केकेआरची 2 बाद 67 असा स्कोअर झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी शानदार बॅटिंग करत केकेआरला विजयी केलं. श्रेयस-वेंकटेश या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची विजयी भागीदारी केली. श्रेयसने 24 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 धावांची नाबाद खेळी केली. तर वेंकेटश अय्यर याने 28 चेंडूत 4 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 51 रन्स केल्या. तर हैदराबादकडून कॅप्टन पॅट कमिन्स आणि टी नटराजन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी केकेआरने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने 19.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 159 धावा केल्या. हैदराबादकडून चौघांना भोपळाही फोडता आला नाही. तर राहुल त्रिपाठी याने 55, हेन्रिक क्लासेन याने 32 आणि कॅप्टन पॅट कमिन्स याने अखेरच्या क्षणी नाबाद राहत नाबाद 30 धावा केल्या. तर अब्दुल समद याने 16 धावांचं योगदान दिलं. तर नितीश रेड्डी 9, वैशाखनाथ याने 7* आणि अभिषेक शर्मा याने 3 धावा जोडल्या. केकेआरकडून मिचेल स्टार्क याने 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थीला 2 विकेट्स मिळाल्या. तर वैभर अरोरा, हर्षित राणा, सुनील नरीन आणि आंद्रे रसेल या चौघांनी 1-1 विकेट घेतली.
कोलकाताचा विजयी क्षण
What a memorable 𝗞𝗻𝗶𝗴𝗵𝘁 for the men in purple 💜
Unbeaten half-centuries from Venkatesh Iyer 🤝 Shreyas Iyer
The celebrations continue for the final-bound @KKRiders 😎
Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAlyXF#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/xBFp3Sskqq
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेअर्स : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.
सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर्स: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि जयदेव उनाडकट.