आयपीएल 17 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात कोलकात नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादचं नेतृत्व आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे केकेआरची कॅप्टन्सी आहे. श्रेयसची दुखापतीनंतर आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला आहे. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता पहिले बॅटिंग करणार आहे.
श्रेयस अय्यर याने दुखापतीनंतर केकेआरसाठी कमबॅक केलं आहे. श्रेयसला दुखापतीमुळे 16 व्या हंगामाला मुकावं लागलं होतं. त्यामुळे नितीश राणा याने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता श्रेयसचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे नितीश राणा हा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तर सनरायजर्स हैदराबादने एडन मारक्रम याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन पॅट कमिन्स याला कॅप्टन केलं आहे. पॅटने अशाप्रकारे केकेआर विरुद्धच्या सामन्यातून कर्णधार म्हणून पदार्पण केलंय.
दरम्यान केकेआर आणि एसआरएच दोन्ही संघांनी आपल्या सलामीच्या सामन्यात प्रत्येकी 4 खेळाडूंचा समावेश केला आहे. केकेआरमध्ये सुनील नरीन, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क आणि फिलिप सॉल्ट याचा समावेश आहे. तर एसआरएचमध्ये कॅप्टन पॅट कमिन्स,हेनरिक क्लासेन, एडन मारक्रम आणि मार्को जान्सेन या चौघांचा समावेश आहे.
हैदराबादने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@SunRisers win the toss in Kolkata and elect to bowl in Match 3️⃣ of #TATAIPL 🙌#KKRvSRH pic.twitter.com/Zo1fDFcY4x
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.