आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफमधील क्वॉलिफायर 1 सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कोण बाजी मारणार अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे या सामन्यात चमकदार कामगिरी कोण करणार याचीही चर्चा रंगली आहे. दोन्ही संघात तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. त्यामुळे कोण कधी सामन्याची सूत्र फिरवेल सांगता येत नाही. फिल सॉल्टची उणीव कोलकाता नाईट रायडर्सला भासणार यात शंका नाही. कारण कोलकात्याला चांगली सुरूवात करून देण्यात त्याचा हातखंडा होता. मात्र त्याच्या गैरहजेरीत फटका बसू शकतो.
सनरायझर्स हैदराबादचे पाच खेळाडू, तर कोलकाता नाईट रायडर्सचे सहा खेळाडू सामना फिरवू शकतात. सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन ही नावं आहेत. तर कोलकात्याकडून सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग,आंद्रे रस्सेल,मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा ही नावं आघाडीवर आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अहमदाबाद 21 मे रोजी कोरडे राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच पावसाची शक्यता दिसत नाही. त्यामुळे हा सामना ठरल्या दिवशीच आणि 20 षटकांचा होईल. त्यामुळे क्रीडाप्रेमींना एका सामन्याची पर्वणी मिळेल. दुसऱ्या डावात दव पडू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. पण या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारून जिंकू शकतो.कारण वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला खेळपट्टीचा फायदा होऊ शकतो आणि नंतर फिरकीपटू डाव सावरू शकतात.
कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरीन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अब्दुल समद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत