KKR vs SRH : आपल्याच संघाच्या खेळाडूने ट्रेव्हिस हेडचा केला घात, खातंही न खोलता परतला तंबूत Watch Video

| Updated on: May 21, 2024 | 8:12 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतली क्वॉलिफायर 1 चा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. महत्त्वाच्या सामन्यात ट्रेव्हिस हेडकडून अपेक्षा होत्या. मात्र दुसऱ्या चेंडूवर खातंही न खोलता तंबूत परतला. आपल्या संघाच्या खेळाडूंना बरोबर जाळ्यात ओढलं.

KKR vs SRH : आपल्याच संघाच्या खेळाडूने ट्रेव्हिस हेडचा केला घात, खातंही न खोलता परतला तंबूत Watch Video
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला. यावेळी पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाचा ठरत असल्याने हा निर्णय घेण्याचं कारण क्रीडाप्रेमींना काही रुचलं नाही. यावेळी पॅट कमिन्सने सांगितलं की, या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी राहू शकते. पण त्याचा हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण आघाडीचे फलंदाजी झटपट तंबूत परतले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेले ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा आले तसेच तंबूत परतले. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ बॅकफूटवर आला. ट्रेव्हिस हेडचा काटा तर त्याच्या संघ सहकाऱ्याने काढला. राष्ट्रीय खेळाची प्रॅक्टिस करताना हे दोन खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे मिचेल स्टार्कने त्याला बरोबर जाळ्यात ओढलं.आयपीएल 2024 स्पर्धेत ट्रेव्हिस हेडची बॅट चांगली तळपताना दिसली आहे. एकदा का खेळपट्टीवर सेट झाला आणि गोलंदाज रडारवर आले तर मग काय खैर नाही. अशीच काहीशी अपेक्षा त्याच्याकडून क्वॉलिफायर 1 फेरीत होती. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने रचलेल्या जाळ्यात फसला आणि खातंही न खोलता तंबूत परतला.

ट्रेव्हिस हेड टिकला तर काही खरं याची जाणीव कोलकाता संघाला होती. त्यामुळे ट्रेव्हिस हेडचा खेळ जवळून जाणणाऱ्या मिचेल स्टार्कला कर्णधार श्रेयस अय्यरने चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर धाव घेण्यात अपयशी ठरला आणि दुसऱ्याच चेंडूवर त्याने त्याचा त्रिफळा उडवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या धावगतीवर ब्रेक लागला. इतकंच काय तर सनरायझर्स हैदराबादला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे. इतकंच काय तर चार गडी झटपट बाद झाले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन.