IPL 2024 : लखनऊला तगडा धक्का, शिवम मावी दुखापतीमुळे ‘आऊट’

| Updated on: Apr 03, 2024 | 3:45 PM

Ipl 2024 : आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान आणखी एक खेळाडू दुखापतीचा शिकार झाला आहे. या दुखापतीमुळे खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

IPL 2024 : लखनऊला तगडा धक्का, शिवम मावी दुखापतीमुळे आऊट
IPL 2024 TROPHY,
Follow us on

लखनऊ सुपर जायंट्सने मंगळवारी 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये 28 धावांनी विजय मिळवला. लखनऊने आरसीबाला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबीला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 153 धावाच करता आल्या. लखनऊचा हा अशाप्रकारे सलग दुसरा विजय ठरला. लखनऊने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली. मात्र त्यानंतरही लखनऊला मोठा झटका लागला आहे. लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज या 17 व्या हंगामातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

लखनऊचा वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. शिवम मावी बाहेर झाल्याने लखनऊला हा मोठा झटका आहे. लखनऊने शिवमला मिनी ऑक्शनमधून 6 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र त्याने दुखापतीमुळे आता माघार घेतली आहे. लखनऊ टीमने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

शिवम मावी काय म्हणाला?

लखनऊने एक्सवर शेअर केलेल्या व्हीडिओत शिवम दुखापतीबाबत सांगतोय. “मू टीमला फार मिस करेन. दुखापतीतून सावरल्यानंतर टीमसाठी खेळेन आणि चमकदार कामगिरी करेन, असा विचार केला होता. मात्र दुर्देवाने मला जावं लागत आहे कारण दुखापत. दुखापत झाली तर कमबॅक कसं करायचं आणि कशावर लक्ष द्यायचं, यासाठी क्रिकेटपटूंना अशा गोष्टींसाठी मानसिकरित्या तयार रहावं लागतं”, असं शिवम मावीने म्हटलं.

शिव मावी दुखापतीमुळे 17 व्या मोसमातून बाहेर

मावीचं चाहत्यांचा आवाहन

दरम्यान मावीने संदेश देत चाहत्यांना आवाहन केलंय. “आमची टीम फार चांगली आहे. चाहत्यांसाठीच हाच संदेश आहे की लखनऊला सपोर्ट करत राहा. चाहत्यांशिवाय काहीच नाही. जेव्हा चाहते पाठिंबा देतात तेव्हा चांगलं वाटतं तसेच खेळाडूंनाही विश्वास मिळतो”, असं मावीने म्हटलं.

शिवम मावीची आयपीएल कारकीर्द

शिवम मावी याने 2018 साली कोलकाता नाईट रायडर्स टीमकडून आयपीएल पदार्पण केलं. केकेआरने मावीला तेव्हा 3 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. मावी 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. मात्र त्याला एकही सामन्यात संधी मिळाली नाही. आता मावी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मावीने आयपीएल कारकीर्दीतील 32 सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मावीने टीम इंडियाचं 6 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना 7 विकेट्स घेतल्या आहेत.