LSG vs CSK : चेन्नईच्या पराभवानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाडने पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं?

| Updated on: Apr 20, 2024 | 12:20 AM

Ruturaj Gaikwad LSG vs CSK Post Match Presentation : चेन्नई सुपर किंग्सला लखनऊ सुपर जायंट्सकडून 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. चेन्नईच्या पराभवानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?

LSG vs CSK : चेन्नईच्या पराभवानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाडने पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात चेन्नई सुपर जायंट्सवर 8 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं 177 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनऊने हे आव्हान 6 बॉलआधी 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लखनऊने 19 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या. कॅप्टन केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक हे दोघे लखनऊच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कॅप्टन केएलने 82 धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने 54 रन्स केल्या. निकोलस पूरन आणि मार्कस स्टोयनिस या जोडीने अनुक्रमे 23 आणि 8 धावा केल्या. लखनऊचा हा चौथा विजय आणि चेन्नईचा हा तिसरा पराभव ठरला. चेन्नईच्या या पराभवानंतर ऋतुराज काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?

“आम्ही बॅटने चांगली कामगिरी केली.पॉवरप्लेनंतर आम्हाला मिळालेल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही, आम्ही ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. आम्ही 10-15 धावांनी कमी पडलो. 190 ही चांगली धावसंख्या ठरली असती”, असं ऋतुराजने पराभवानंतर म्हटलं. तसेच पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेण्याच्या बाबतीत आम्हाला सुधारणा करायची आहे, त्यामुळे विरोधकांवर दबाव येईल, असंही ऋतुराजने नमूद केलं. तसेच चेन्नई त्यांच्या होम ग्राउंड 3 सामने खेळायचे आहेत. एमए चिदंबरम स्टेडियम हे चेन्नईचं होम ग्राउंड आहे. ऋतुराजने या 3 सामन्यांबाबत प्रतिक्रिया दिली. “आम्हाला घरच्या मैदानात 3 सामने खेळायचे आहेत. तेव्हा आम्ही जोरदार तयारी करु”, असा विश्वासही ऋतुराजने व्यक्त केला.

लखनऊचा चेन्नईवर दणदणीत विजय

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पाथीराना.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकुर.