आयुष बदोनी आणि अर्शद खान या दोघांनी केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे दिल्ली कॅपिट्ल्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं आहे. आयुष बदोनी याने केलेल्या नाबाद 55 धावांच्या जोरावर लखनऊला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 167 पर्यंत मजल मारता आली. आयुषने केलेल्या या खेळीमुळे लखनऊला दिल्लीसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. आता दिल्ली हे आव्हान पूर्ण करणार की लखनऊ विजयी धावांचा बचाव करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनऊने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र कॅप्टन केएल राहुल याचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. केएल राहुल याने 22 बॉलमध्ये 39 धावा केल्या. तर दिल्लीच्या गोलंदाजांसमोर लखनऊचे फलंदाज निष्प्रभ ठरले. लखनऊची 13 ओव्हरमध्ये 7 बाद 94 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर आयुषने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. तर दुसऱ्या बाजूने मयंक यादव याच्या जागी संधी मिळालेल्या अर्शद खान याने आयुषला चांगली साथ दिली. या दोघांनी शेवटपर्यंत नाबाद निर्णायक भागीदारी करत लखनऊला सामन्यात कायम ठेवलं. आयुष आणि अर्षद या दोघांनी आठव्या विकेटसाठी 45 बॉलमध्ये नाबाद 73 धावांची भागीदारी केली.
आयुषने 35 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 सिक्ससह नाबाद 55 धावा केल्या. तर अर्दने 16 बॉलमध्ये 2 फोरसह नॉट आऊट 20 रन्स केल्या. तर केएलने 22 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. क्विंटन डी कॉक 19 आणि दीपक हुड्डा याने 10 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त इतर अपयशी ठरले. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. खलील अहमदने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर इशांत शर्मा आणि मुकेश कुमार या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
कोण जिंकणार सामना?
Innings Break!
An unbeaten 55* from Ayush Badoni propels @LucknowIPL to 167/7 👌👌
Will it be enough for #DC? Chase coming up shortly!
Scorecard ▶️ https://t.co/0W0hHHG2sq#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/e1U1miEmI1
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि यश ठाकुर.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.