IPL 2024 : Ramandeep Singh कडून कॅच ऑफ द सिजन! अर्शीन कुलकर्णीही थक्क, व्हीडिओ व्हायरल

| Updated on: May 05, 2024 | 10:48 PM

Ramandeep Singh Catch Of Arsheen Kulkarni Video : कोलकाता नाईट रायडर्सच्या रमनदीप सिंह याने अर्शीन कुलकर्णी याचा घेतलेला अप्रतिम कॅच पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत. पाहा व्हायरल व्हीडिओ.

IPL 2024 : Ramandeep Singh कडून कॅच ऑफ द सिजन! अर्शीन कुलकर्णीही थक्क, व्हीडिओ व्हायरल
Ramandeep Singh Catch Of Arsheen Kulkarni,
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं. केकेआरसाठी सुनील नरीनने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. तर लखनऊकडून नवीन उल हक याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात लखनऊकडून अर्शीन कुलकर्णी आणि कॅप्टन केएल राहुल ही सलामी जोडी विजयी धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. अर्शीन कुलकर्णी याने मुंबई विरुद्धच्या सामन्यातून 30 एप्रिल रोजी आयपीएल पदार्पण केलं. अर्शीन पदार्पणातील सामन्यात अपयशी ठरला. अर्शीन झिरोवर आऊट झाला होता. त्यामुळे अर्शीनवर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 236 धावांचा पाठलाग करताना टीमला चांगली सुरुवात करुन देण्यासह खातं उघडण्याचा दुहेरी दबाव होता.

अर्शीनने अप्रतिम सुरुवात केली. मात्र रमनदीप सिंह याने उलट धावत अफलातून कॅच घेत अर्शीनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रमनदीप सिंह याने अर्शीनचा घेतलेला कॅच हा कॅच ऑफ द सिजन असल्याचंही म्हटलं जात आहे. यावरुन रमनदीप सिंहने काय दर्जाचा कॅच घेतला असले, याचा अंदाज बांधता येईल. रमनदीपने नक्की कसा कॅच घेतला, नक्की काय झालं? हे जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क केकेआरच्या डावातील दुसरी ओव्हर टाकायला आला. मिचेल स्टार्कने या ओव्हरमधील शेवटच्या बॉल हा 139.2 किमी वेगाने टाकला. अर्शीनने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्शीनच्या बॅटला बॉल कड घेऊन दुसऱ्याच बाजूला गेला. रमनरदीप सिंह याने 21 मीटर उलट दिशेने धावत हवेत उडी घेत अफलातून कॅच घेतला. रमनदीप सिंहने घेतलेला कॅच पाहून अर्शीन कुलकर्णीही चकित झाला. रमनदीपने घेतलेल्या या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रमनदीप सिंह याने घेतलेल्या कॅचमुळे अर्शीनच्या खेळीचा द एन्ड झाला. अर्शीनने 7 बॉलमध्ये 128.57 च्या स्ट्राईक रेटने 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या. अर्शीन आऊट झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर रमनदीपने घेतलेल्या कॅचसाठी आर्शचर्याचे भाव होते. रमनदीप सिंहने घेतलेला कॅच हा या हंगामातील सर्वोत्तम कॅच असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

रमनदीपकडून अफलातून कॅच

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान आणि यश ठाकूर.