आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्संच नेतृत्व करतोय. तर हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबई इंडियन्सची सूत्रं आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे भारररत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. लखनऊने टॉस जिंकला. कॅप्टन केएल राहुल याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. त्यामुळे आता मुंबई लखनऊसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार, याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सने या सामन्साठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. लखनऊने 2 बदल केले आहेत. क्विंटन डी कॉकच्या जागी सोलापूरकर अर्शीन कुलकर्णी याला संधी देणयात आली आहे. तर मयंक यादवचं कमबॅक झालं आहे. मयंकला दुखापतीमुळे गेले काही सामने खेळता आले नाहीत. तर मुंबई इंडियन्समध्ये 1 बदल आहे. ल्यूक वूड याला बाहेर केलं गेलं आहे. तर गेराल्ड कोएत्झी याची रिएन्ट्री झाली आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबई या दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 4 सामने झाले आहेत. लखनऊ मुंबईवर वरचढ राहिली आहे. लखनऊने मुंबईचा 3 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर मुंबईला केवळ 1 सामना जिंकण्यात यश आलंय. त्यामुळे मुंबईचा लखनऊ विरुद्ध ही आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.
लखनऊने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bowl against Mumbai Indians.
Follow the Match ▶️ https://t.co/I8Ttppv2pO#TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/Xy0DcL6by1
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान आणि मयंक यादव.