LSG vs MI : मुंबईची फ्लॉप बॅटिंग, लखनऊसमोर 145 धावांचं आव्हान

| Updated on: Apr 30, 2024 | 9:47 PM

Lucknow Super Giants vs Mumbai Indians 1st Innings Highlights In Marathi : मुंबईचे फलंदाज लखनऊसमोर निष्प्रभ ठरले.

LSG vs MI : मुंबईची फ्लॉप बॅटिंग, लखनऊसमोर 145 धावांचं आव्हान
Follow us on

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. लखनऊच्या धारदार बॉलिंगसमोर मुंबईची बॅटिंग फ्लॉप ठरली. मात्र नेहल वढेरा आणि ईशान किशन या दोघांनी चिवट खेळी केली. तर अखेरच्या क्षणी टीम डेव्हिड याने केलेल्या नाबाद 35 धावांच्या खेळीमुळे मुंबईला 140 पार मजल मारता आली. या तिघांच्या खेळीमुळे मुंबईला लखनऊसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. तर लखनऊकडून मोहसिन खान याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

मुंबईसाठी नेहल वढेरा याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. नेहलने 41 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 46 धावांची खेळी केली. टीम डेव्हिड याने 18 बॉलमध्ये अखेरच्या क्षणी 35 धावा केल्या. टीमच्या या खेळीत 3 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. तर ओपनर विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने 36 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. ईशानच्या या खेळीत 3 चौकारांचा समावेश होता.

मुंबईकडून टीम डेव्हिड, ईशान किशन आणि नेहल वढेरा या तिघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. सूर्यकुमार यादव याने 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या. रोहित शर्मा 4 धावा करुन तंबूत परतला. तिलक वर्माने 7 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या झिरोवर आऊट झाला. मोहम्मद नबी आणि गेराल्ड कोएत्झी या दोघांनी 1-1 विकेट घेतली. लखनऊकडून मोहसिन खान याच्या व्यतिरिक्त चौघांनी विकेट घेतल्या. मार्क्स स्टोयनिस, नवीन उल हक, मयंक यादव आणि रवी बिश्नोई या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

लखनऊसमोर मुंबई फ्लॉप

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान आणि मयंक यादव.