आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. लखनऊने टॉस गमावून पहिले बॅटिंग केली. लखनऊने कॅप्टन केएल राहुल आणि दीपक हुड्डा या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सने 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 196 धावा केल्या. लखनऊची ही आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. लखनऊने सर्वोच्च धावसंख्या याच हंगामात पंजाब किंग्स विरुद्ध उभारली होती. लखनऊने पंजाब विरुद्ध 8 विकेट्स गमावून 199 धावा केल्या होत्या.
लखनऊकडून कॅप्टन केएल राहुल आणि दीपक हुड्डा या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. केएलने 48 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 चौकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. तर दीपक हुड्डा याने 31 बॉलमध्ये 7 चौकारांसह 50 धावांची वादळी खेळी केली. दीपकने या धावा 161.29 च्या स्ट्राईक रेटने केल्या. केएल आणि दीपक व्यतिरिक्त एकाहाली 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.
क्विंटन डी कॉक याने सलग 2 चौकार ठोकून अफतातून सुरुवात केली. मात्र तिसऱ्याच बॉलवर ट्रेन्ट बोल्ट याने त्याला क्लिन बोल्ड केला. मार्क्स स्टोयनिस याला भोपळाही फोडता आला नाही. निकोलस पूरन 11 धावा करुन माघारी परतला. तर आयुष बदोनी आणि कृणाल पंड्या या दोघांनी अखेरीस छोटेखानी पण निर्णायक धावा केल्या. ही जोडी नाबाद परतली. आयुषने 13 बॉलमध्ये 18 धावा केल्या. तर कृणालने 11 चेंडूत 15 धावांचं योगदान दिलं. तर राजस्थानकडून संदीप शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान, आर अश्विन आणि बोल्ट या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
लखनऊकडून राजस्थानला 197 धावांचं आव्हान
Innings Break!#LSG set a 🎯 of 1️⃣9️⃣7️⃣ of with crunch fifties from KL Rahul & Deepak Hooda 🙌
Which team will continue their winning run? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/Dkm7eJqwRj#TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/4dvv5yD64g
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकूर.