आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सनराजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पाडला. या सामन्यामध्ये हैदराबाद संघाने लखनऊ संघावर दहा विकेट आणि 62 चेंडू राखून विजय मिळवला. लखनऊचा सलग दुसरा पराभव झाल्याने आता क्वालिफाय होण्याची वाट धूसर झालीये. सामना संपल्यानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांचा आणि के. एल. राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संजी गोयंका हे के. एल. राहुल याच्यावर संतापले दिसत आहेत.
आयपीएलमध्ये एखाद्या संघाचा मालक आपल्या कॅप्टनला भर मैदानात झापण्याची पहिली वेळ असावी. के.एल. हा लहान किंवा नवखा खेळाडू नाही. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारीसुद्धा त्याने पार पाडली आहे. सामना संपल्यावर एखाद्या लहान मुलाला ओरडल्यासारखे गोयंका राहुलवर ओरडत असल्याचं दिसलं. राहुलने नम्रपणा दाखवला त्यावेळी गोयंका यांना काहीही बोलला नाही. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
के. एल. राहुलच्या चाहत्यांनी गोयंका यांना फटकारलं आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. संघाचे मालक असले म्हणून काय झालं? खेळाडूसोबत वागण्याची एक पद्धत असते. आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तुम्ही अशा प्रकारे नाही वागू शकत. आरसीबीच्या चाहत्यांनी तर के.एल. याला परत आरसीबीमध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
One thing is clear RCB management never treat their players like this.
The way he is giving lecture to KL Rahul and he is silently listening
Come to RCB you won’t face this in life… pic.twitter.com/r6L5tj2WBh— Dr.Shaun🇵🇸 (@fiftysix56__) May 9, 2024
A player of such calibre KL Rahul needing to bear the wrath of the team owner on field in national media is depressing to say the least ! #pathetic
U guys are disappointed – we get it ! Talk it out in a team meeting behind closed doors fgs !
— Mahi (@mahiban4u) May 8, 2024
दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 165-4 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवला.