आयपीएलमधील 15 व्या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने घरच्या मैदानावर आरसीबीचा 28 धावांनी पराभव केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनऊने आरसीबीला घरच्या मैदानावर चारीमुंड्या चीत केलं. लखनऊने दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 153-10 धावा केल्या. माहिपाल लोमरोर याने सर्वाधिक 33 धावा तर रजत पाटीदार याने 29 धावा केल्या. टॉप ऑर्डरची पडझड झाल्यावर आरसीबीच्या इतर कोणत्याही खेळाडूने डाव सावरला नाही. अखेर या सीझनमधील आरसीबीचा तिसरा पराभव तर लखनऊ संघाने हा सलग दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात मयंक यादव याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. सलग दुसऱ्या सामन्यात त्याला सामनावीर म्हणून निवड झाली आहे.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 200 च्या आतमधील धावसंख्येचा पाठलाग करणं फार काही कठीण जात नाही. त्यामुळे आरसीबी घरच्या मैदानावर सहज विजय मिळवणार असं बोललं जात होतं. मात्र लखनऊने आरसीबीला घरच्या मैदानावर 28 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांना रोखण्यासाठी राहुलने खाल चाल खेळली. पहिलीच ओव्हर स्पिनरला दिली, तमिळनाडूचा सिद्धार्थ दोघांवर चांगलाच भारी पडला. अखेर त्याने विराट कोहलीला 22 धावांवर माघारी पाठवलं.
विराट आऊट झाल्यावर रजत पाटीदार याने 29 धावा आणि माहिपाल लोमरोर याने 33 धावा केल्या. दोघांना सोडून इतर कोणत्याही खेळाडूला मैदानावर धावा काढत्या आल्या नाहीत. आजच्या सामन्यात लखनऊचा खेळाडू राजधानी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा मयंक यादव याकडे सर्वांच्या नजरा होत्या. पठ्ठ्याने या सामन्यातही सर्वांची मने जिंकलीत. आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 13 धावा देत 3 विकेट घेतल्या, एकूण 17 बॉल त्याने निर्धाव टाकले. लखनऊ संघासाठी जमेची बाजू झाली असून या विजयासह लखनऊ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (C), कैमरून ग्रीन, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), रीस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेवन): क्विंटन डी कॉक (WK), केएल राहुल (C), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक, मयंक यादव