IPL 2024 : सूर्याची पलटणमध्ये एन्ट्री केव्हा? तारीख ठरली!

| Updated on: Apr 04, 2024 | 5:03 PM

IPL 2024 Suryakumar Yadav Comeback : मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. सूर्यकुमार यादव याची मुंबईत एन्ट्री होण्याची तारीख ठरली आहे.

IPL 2024 : सूर्याची पलटणमध्ये एन्ट्री केव्हा? तारीख ठरली!
suryakumar and hardik mi,
Follow us on

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सुरुवात निराशाजनक राहिली. मुंबई इंडियन्सला सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. आधी रोहितऐवजी हार्दिकला कॅप्टन करण्यात आलं. त्यानंतर सलग 3 सामने गमवावे लागले. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकला जोरदार ट्रोल केलं. मुंबईत 2 गट पडल्याची चर्चा सुरु झाली. कर्णधार बदलण्याची मागणी जोर धरु लागली. या दरम्यान मुंबईच्या चाहत्यांसाठी आणि कॅप्टन म्हणून हार्दिक पंडया याच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

मुंबई इंडियन्सचा मॅचविनर फलंदाज सूर्यकुमार यादव याला बुधवारी 3 एप्रिल रोजी एनसीएकडून ग्रीन सिग्नल मिळाला. सूर्यकुमार फिट असल्याचं एनसीएने जाहीर केलं. त्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. इतकंच नाही, तर आता सूर्यकुमार मुंबई इंडियन्ससोबत केव्हा जोडला जाणार? याबाबतची माहितीही समोर आली आहे. क्रिकबझनुसार, सूर्या 5 एप्रिल रोजी मुंबई टीमसह जोडला जाईल.

हे सुद्धा वाचा

मुंबई या हंगामातील आपला चौथा सामना हा 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबई हा सामना आपल्या होमग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. सूर्यकुमार याचंही वानखेडे स्टेडियम होम ग्राउंड आहे. त्यामुळे सूर्याला आपल्या होम ग्राउंडमधून कमबॅक करणार, यापेक्षा आणखी चांगली गोष्ट काय असू शकते. मात्र अजून सूर्याच्या कमबॅकबाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान सूर्या मुंबईसह जोडल्या गेल्यानंतर तो सराव करणार आहे. तसेच रविवारी 7 एप्रिल रोजी दिल्ली विरुद्धच्या सामन्यातून सूर्या ब्लू जर्सीमध्ये दिसू शकतो. सूर्याच्या कमबॅकमुळे कॅप्टन हार्दिक पंड्या याचे अच्छे दिन पुन्हा सुरु होऊ शकतात. आता सूर्याकडून पलटणला पहिल्या विजयाची अपेक्षा असणार आहे.

सूर्याच्या कमबॅकची तारीख ठरली!

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.