आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग 3 सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव अखेर फिट झाला आहे. सूर्याला फिट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच मुंबईची ताकद एका झटक्यात दुप्पट झाली आहे. मुंबई या हंगामातील आपला चौथा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 7 एप्रिल रोजी खेळणार आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यातून कमबॅक करण्याची शक्यता आहे. एकूणच सूर्या फिट झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
सूर्यकुमार यादवला एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने हिरवा सिग्नल देत खेळण्यासाठी फिट असल्याचं जाहीर केलं आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे क्रिकेटपासून गेल्या 3 महिन्यांपासून दूर होता. सूर्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20 मालिकेदरम्यान घोट्याला दुखापत झाली होती. सूर्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुखापत झाली होती. तेव्हापासून सूर्या मैदानापासून बाहेर होता. सूर्यावर या दरम्यान शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सूर्याने एनसीए फिट होण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कमबॅकसाठी तयारी केली. त्यानंतर आता सूर्या सज्ज झाला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सूर्याची एकूण 3 वेळा फिटनेस टेस्ट करण्यात आली. सूत्राने दिलेल्या माहितनुसार, “सूर्या आता फिट आहे. सूर्या एनसीएत सराव सामने खेळला. तो मुंबईसोबत जोडला जाऊ शकतो. सूर्या मुंबईसह जोडला जाईल तेव्हा तो 100 टक्के फिट असावा, हे आम्ही निश्चित करु पाहत होतो. सूर्या आयपीएलआधी पहिल्या फिटनेसआधी पूर्णपणे फिट वाटत नव्हता. त्यामुळे आम्ही सूर्याला बॅटिंग करताना त्रास होतोय की नाही? याची प्रतिक्षा करत होतो”.
सूर्यकुमार यादव सज्ज
Surya Bhau is Back 🔙💙.. !! pic.twitter.com/muBxZHG8UN
— MI Fans Army™ (@MIFansArmy) April 3, 2024
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.