मुंबई | बीसीसीआयने आगामी आणि बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने लोकसभा निवडणूकीमुळे आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 शहरांमध्ये 17 दिवस 21 सामने पार पडणार आहेत. पहिला टप्पा हा 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ किमान 3 आणि कमाल 5 सामने खेळणार आहे. या निमित्ताने आपण मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स या पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल मोहिमेतील आपला सलामीचा सामना हा 24 मार्च रोजी खेळणार आहे. तर अखेरचा चौथा सामना हा 7 एप्रिल रोजी खेळेल. मुंबई या 4 सामन्यांपैकी 2 सामने घरच्या मैदानात आणि 2 प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राऊंडमध्ये खेळेल.
दरम्यान या 17 व्या मोसमापासून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला आहे. आता रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. हार्दिकला गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्सने ट्रान्सफर विंडोद्वारे आपल्या गोटात घेतलं. त्यानंतर रोहितकडून कर्णधारपद काढून ते हार्दिकला दिलं. त्यामुळे आता पलटण हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार 24 मार्च, अहमदाबाद.
सनरायजर्स हैजराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, बुधवार 27 मार्च, हैदराबाद.
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स, 7 एप्रिल, मुंबई.
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स | रोहित शर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेविड, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रित बुमरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडूलकर, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी आणि शिवालिक शर्मा.