मुंबई | आयपीएल अध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगिलेल्या तारखेलाच 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. भारतात लोकसभा निवडणुका असल्याने यंदा बीसीसीआयने आयपीएल 2024 चं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिल्या टप्प्यात 17 दिवसांमध्ये एकूण 21 सामने पार पडणार आहेत. यामध्ये 3 डबल हेडरचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील सामने हे 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. तर 23, 24 आणि 31 मार्च रोजी डबल हेडर पार पडेल.
पहिल्या टप्प्यात प्रत्येक टीम किमान 3 आणि जास्तीत जास्त 5 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स टीमचं नेतृत्व हे हार्दिक पंड्या करणार आहे. रोहित शर्माने गेली 11 वर्ष पलटणचा गाडा सांभाळल्यानंतर आता नेतृत्वाची धुरा ही हार्दिककडे असणार आहे. हार्दिकसमोर पहिल्याच सामन्यात आतापर्यंतच सर्वात मोठं आव्हान असणार आहे. हार्दिक हे आव्हान पेलणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मुंबई इंडियन्स पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. या 4 सामन्यांमधील अखेरचे 2 सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडतील. तर पहिले 2 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडमध्ये होणार आहेत. मुंबई आपल्या मोहिमेची सुरुवात गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. मुंबईचा पहिला सामना हा 24 मार्च रोजी अहमदाबादमध्ये पार पडणार आहे. या सामन्यात हार्दिकसमोर मुंबईची गेल्या 11 वर्षांची परंपरा बदलण्याचं आव्हान असणार आहे.
मुंबई इंडियन्सला गेल्या 11 वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्से अखेरचा मोसमातील आपला पहिला सामना हा 2012 साली जिंकला होता. मुंबईने 2012 साली चेन्नईचा पराभव करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर मुंबईला या स्पर्धेतील आपला पहिला सामना काही जिंकताच आला नाही. मुंबईला 16 व्या मोसमातही 3 एप्रिल 2023 रोजी आरसीबीने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता कॅप्टन या नात्याने हार्दिकसमोर मुंबई इंडियन्सची गेल्या 11 वर्षांची परंपरा मोडून काढण्याचं आव्हान असणार आहे.
पलटणचं वेळापत्रक
𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝟏𝟕, 𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞𝐬 𝟏-𝟒 ⬇️🍿#OneFamily #MumbaiIndians #TATAIPL pic.twitter.com/gvV9Z4LTtO
— Mumbai Indians (@mipaltan) February 22, 2024
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स | रोहित शर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेविड, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रित बुमरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडूलकर, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी आणि शिवालिक शर्मा.