IPL 2024 : पराभवानंतर मुंबईचे खेळाडू गुजरातमध्ये! रोहितसोबत कोण? व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Apr 03, 2024 | 6:22 PM

Mumbai Indians Ipl 2024 : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपले 3 सामने गमावले आहेत. त्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडू हे गुजरातला गेले असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

IPL 2024 : पराभवानंतर मुंबईचे खेळाडू गुजरातमध्ये! रोहितसोबत कोण? व्हीडिओ व्हायरल
rohit sharma ipl,
Follow us on

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी पराभूत केलं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने मुंबईचा वानखेडे स्टेडियममध्ये धुव्वा उडवला. हार्दिक तिन्ही सामन्यात कॅप्टन म्हणून अपयशी ठरला. त्यामुळे रोहित शर्मा याला पुन्हा एकदा कर्णधार करावं, अशी मागणी जोर धरतेय. अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई इंडियन्स या हंगामातील आपला चौथा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी मुंबईच्या खेळाडूंचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत रोहित शर्मा गुजरातमधील जामनगरमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचे खेळाडू जामनगरमध्ये ब्रेक घेणार आहेत. आता या ब्रेकमध्ये मुंबईच्या खेळाडूंमध्ये आगामी सामन्यासाठी रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे.

राजस्थान विरुद्ध पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स आणखी 3 सामने हे वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना सामन्यांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा वेळ वाचणार आहे. मुंबई चेन्नई विरुद्ध 14 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडिओत रोहित शर्मा सहकुटुंब दिसत आहे. काही तासांपूर्वी ईशान किशस याचा सुपरमॅनच्या आऊटफिटमधील व्हीडिओ व्हायरल झाला होता. रोहितचा व्हीडिओही त्यापैकी एक आहे.

व्हीडिओ व्हायरल

मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा, त्याचे कुटुंबिय आणि इतर खेळाडू जामनगरला पोहचले. हे सर्व खेळाडू आराम करणार आहेत. रोहितसह तिलक वर्मा, ईशान किशन आणि इतर खेळाडू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या खेळाडूंचा जामनगर दौरा हा पूर्वनियोजित होता. तसेच आर अश्विन याने मुंबई राजस्थान विरुद्धच्या सामन्यानंतर ब्रेकवर असल्याचं म्हटलंय. मुंबई इंडियन्स टीम जामनगरला गेली आहे, जिथे अंबानीची प्री वेडिंग सेरमनी झाली होती. ते तिथे इंजॉय करणार आहेत”, असं अश्विनने म्हटलं.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.