IPL 2024 : हिटमॅनचा पलटणसोबतचा प्रवास संपला? त्या फोटोंमुळे एकच चर्चा

| Updated on: May 19, 2024 | 8:56 PM

Rohit Sharma IPL 2024 : रोहित शर्माने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. रोहितने या फोटोंसह पलटणसोबतचा प्रवास संपल्याचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे.

IPL 2024 : हिटमॅनचा पलटणसोबतचा प्रवास संपला? त्या फोटोंमुळे एकच चर्चा
rohit sharma nets
Image Credit source: rohit sharma x account
Follow us on

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपला अखेरचा सामना हा 17 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला. मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानात लखनऊ विरुद्ध विजय मिळवून शेवट गोड करण्याची सुवर्ण संधी होती. मात्र मुंबईने घरच्या मैदानातही आपल्या चाहत्यांची निराशा केली. हार्दिकच्या कॅप्टन्सीत मुंबईला शेवटच्या सामन्यातही पराभूत व्हावं लागलं. मुंबईचा हा या हंगामातील 10 वा पराभव ठरला. तसेच मुंबईचं आव्हान हे 10 व्या स्थानी संपुष्टात आलं. मुंबईला 14 सामन्यांपैकी अवघ्या 4 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला.

मुंबईसाठी हा हंगाम निराशाजनक राहिला. रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला कॅप्टन्सी दिल्याने पलटणचे चाहते नाराज झाले. तिथूनच मुंबईला उतरती कळा लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, पलटणच्या चाहत्यांनी रोहित आणि इतर खेळाडूंचा समर्थन दिलं तर हार्दिकला जोरदार ट्रोल केलं. मुंबईला त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं. पलटणचा या हंगामातील प्रवास संपल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर एकूण 4 फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे रोहित शर्माचा पलटण सोबतचा प्रवास संपल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे

रोहितने एकूण 4 फोटो शेअर केले आहेत. एक फोटो हा पलटण समर्थकांचा आहे, ज्यात चाहत्यांचा हातात मुंबईचा झेंडा दिसतोय. दुसऱ्या फोटोत रोहितच्या हातामध्ये 2 बॅट आहेत. तिसरा ग्रुप फोटो आहे. सामन्याआधी वानखेडे स्टेडियममध्ये सर्व खेळाडूंचा काढण्यात आलेला फोटो रोहितने शेअर केला आहे. तर चौथा आणि शेवटचा फोटो हृदयस्पर्धी आहे. रोहित या फोटोत आपल्या चाहत्याला बॅटवर ऑटोग्राफ देत आहे.

हिटमॅनची 17 व्या हंगामातील कामगिरी

दरम्यान रोहित शर्मा या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रोहितने 14 सामन्यांमध्ये 1 अर्धशतक आणि 1 शतकासह 32.08 च्या सरासरी आणि 150 च्या स्ट्राईक रेटने एकूण 407 धावा केल्या. रोहितने या एकूण 14 सामन्यांमध्ये 45 चौकार आणि 23 षटकार ठोकले.

रोहितकडून पलटण आणि चाहत्यांसोबतचे फोटो शेअर

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.