मुंबई | आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्स टीमने कॅप्टन बदलला. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवून हार्दिक पंड्याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मुंबईनंतर काही संघांनी कर्णधार बदलले. आता आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची तिंचा वाढली आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याला दुखापत झाली आहे.
हार्दिक पंड्या याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्दिक या व्हायरल व्हीडिओमध्ये स्ट्रेचरवर दिसत आहे. हार्दिकला झालेल्या दुखापतीवर फिजिओ उपचार देत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या व्हायरल व्हीडिओबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र हार्दिक पंड्या याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहता त्याला सरावादरम्यान दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
हार्दिक पंड्या याला सातत्याने दुखापत होत असते. हार्दिकला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत पुण्यात बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. हार्दिक तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानंतर हार्दिकने फेब्रुवारी महिन्यापासून कमबॅक केलं. मात्र आता हार्दिकला जर खरंच दुखापत झाली असेल, तर तो मुंबईसाठी फार मोठा धक्का असेल.
हार्दिकला दुखापत?
श्री श्री १००८ , विश्व के सर्वश्रेष्ठ ऑल राउंडर, हार्दिक कोटि कोटि पंड्या का ये चित्र साझा होने के बाद प्रश्न उठाता है कि #MI लॉबी की #OneFamily थोड़ा घबराएगी? या खुशियां मनाएगी?
बड़ी दुविधा है 🤭🤭#HardikPandya #RohitSharma #IPL2024 #NotOneFamily 😜 pic.twitter.com/6HfE9db3ug— उमेश राणा (@kshatriya_UR) March 14, 2024
मुंबईने खरेदी केलेले खेळाडू | गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज आणि नमन धीर.
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू | रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि जेसन बेहरेनडोर्फ.
ट्रेड केलेले खेळाडू | हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स) आणि रोमारियो शेफर्ड (लखनऊ सुपर जायंट्स)
रिलीज केलेले खेळाडू | अर्शद खान, रमनदीप सिंह, रितिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जेनसन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.