IPL 2024 | सूर्यकुमार यादव याची गुरुवारी अग्निपरीक्षा, फिटनेस टेस्टच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष

| Updated on: Mar 20, 2024 | 11:36 PM

Suryakumar Yadav IPL 2024 | मुंबई इंडियन्सचा तोडू बॅट्समन सूर्यकुमार यादव याची गुरुवारी 21 मार्च रोजी कसोटी असणार आहे. सूर्याच्या फिटनेस टेस्टकडे मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

IPL 2024 | सूर्यकुमार यादव याची गुरुवारी अग्निपरीक्षा, फिटनेस टेस्टच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष
Follow us on

मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाचा श्रीगणेशा 22 मार्चपासून होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव याच्यासाठी गुरुवार 21 मार्च हा दिवस निर्णायक असा असणार आहे. सूर्यकुमारची बंगळुरुतील एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एकेडमीमध्ये फिटनेस टेस्ट होणार आहे. या फिटनेस टेस्टच्या निकालाकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे. कारण या निकालावरच सूर्यकुमारचं सर्व काही ठरणार आहे.

सूर्यकुमार दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर क्रिकेटपासून दूर आहे. सूर्यावर त्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली. सूर्या दुखापतीतून सावरला. मात्र सूर्याला आपण पूर्णपणे फिट आहोत हे एनसीएसमोर सिद्ध करुन दाखवायचं आहे. त्यानंतरच सूर्याला खेळण्याची परवानगी मिळणार आहे. सूर्याने 19 मार्च रोजी फिटनेस टेस्ट दिली. मात्र सूर्या त्यात अपयशी ठरला. सूर्याने या फिटनेस टेस्टनंतर हार्टब्रेक इमोजी पोस्ट केली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी तो धक्का होता.

आता सूर्याची गुरुवारी अग्नीपरीक्षा असणार आहे. सूर्या या फिटनेस टेस्टमध्ये यशस्वी होण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. अन्यथा सूर्यावर आयपीएलमध्ये खेळण्याबाबत टांगती तलवार कायम असणार आहे. त्यामुळे आता गुरुवारी 20 मार्च रोजी होणाऱ्या सूर्याच्या फिटनेस टेस्टचा नक्की काय निकाल लागतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं त्यातही मुंबई इंडियन्सच्या समर्थकांचं लक्ष असणार आहे.

सूर्यकुमार यादव याची क्रिकेट कारकीर्द

सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाचं 1 कसोटी, 37 एकदिवसीय आणि 60 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. सूर्याने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 8, 773 आणि 2 हजार 141 धावा केल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादव याने 2012 साली आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध पदार्पण केलं. सूर्याने तेव्हापासून ते 16 व्या हंगामापर्यंत एकूण 139 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 51 अर्धशतकांसह 2 हजार 267 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, गेराल्ड कोएत्झी, क्वेना मफाका , नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, रोमारियो शेफर्ड आणि नमन धीर.