आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई एकमेकांविरुद्ध 2 हात करणार आहेत. हा सामना 14 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये प्रत्येकी 5-5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांतील या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी कशी राहिलीय, हे जाणून घेऊयात.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात एकूण 36 सामने झाले आहेत. मुंबई या 36 पैकी सर्वाधिक सामने जिंकली आहे. मुंबईने 36 मधून 20 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईनेही 16 सामने जिंकले आहेत. एकूण आकडेवारी पाहिली तर मुंबईचा चेन्नईवरील पगडा जबरदस्त आहे. तसेच मुंबईची चेन्नई विरुद्ध वानखेडे स्टेडियममधील कामगिरीही सरस राहिली आहे. मुंबई-चेन्नई यांच्यात वानखेडेत 11 सामने आतापर्यंत खेळवण्यात आले आहेत. त्या 11 पैकी मुंबईने 7 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला 4 सामन्यात यश आलं आहे.
दरम्यान चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांनी आतापर्यंत या 14 व्या हंगामात प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. चेन्नईने ऋतुराजच्या कॅप्टनसीत 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईने सलग 3 सामने गमावल्यानंतर 2 सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई 3 विजय आणि 6 पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर मुंबई 2 विजय आणि 4 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनव्हे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जादव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.