आयपीएलच्या 17 व्या मोसमात 14 एप्रिल रोजी क्रिकेट चाहत्यांना डबल धमाका पाहायला मिळणार आहे. रविवारी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध लखनऊ आमनेसामने आहेत. तर दुसरा सामना हा महामुकाबला आहे. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या पलटणचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे दोन्ही संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या कामगिरीकडे असणार आहे. या सामन्याबाबत जाणून घेऊयात.
मुंबई विरुद्ध चेन्नई सामना आज 14 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामना हा ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
मुंबई विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनव्हे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जादव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.