IPL 2024, MI vs CSK Video : ऋतुराज गायकवाडचा कॅच पकडताना रोहित शर्माचं झालं असं काही….

| Updated on: Apr 14, 2024 | 9:04 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन दिग्गज संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात असल्याने आयपीएलच्या साखळी फेरीत एकमेव सामना आहे. या सामन्यात खेळाडूंमध्येही प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे. ऋतुराज गायकवाडने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण रोहित शर्माने झेल सोडल्याने हे शक्य झालं.

IPL 2024, MI vs CSK Video : ऋतुराज गायकवाडचा कॅच पकडताना रोहित शर्माचं झालं असं काही....
Image Credit source: video grab
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धतील हायव्होल्टेज सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात सुरुवातीला मुंबईला नशिबाची चांगली साथ मिळाली. नाणेफेकीचा कौल जिंकल्याने प्रथम गोलंदाजी घेता आली. चेन्नई सुपर किंग्सला मोठी धावसंख्या उभारल्याशिवायय पर्याय नाही याची जाणीव होती. त्यामुळे पहिल्यापासून षटकापासून चेन्नईने रणनिती अवलंबली होती. सुरुवातीला अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्रला बाद करण्यात यश मिळालं. पण त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि मुंबईचा लोकल बॉय शिवम दुबेने डाव सावरला. दोघांनी मिळून आश्वासक भागीदारी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे गोलंदाज हतबल दिसले. ऋतुराज गायकवाडला बाद करण्याची संधी मुंबई इंडियन्सला चालून आली होती. मात्र ही संधी रोहित शर्माने गमावली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 12वं षटक आकाश मढवालच्या हाती सोपवलं होतं. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने उत्तुंग फटका मारला. शॉर्ट चेंडूवर ऋतुराज गायकवाडने मिड विकेटच्या दिशेने फटका मारला. त्याच भागात रोहित शर्मा क्षेत्ररक्षण करत होता. त्यामुळे कॅच पकडण्यासाठी धाव घेतली आणि झेलच्या खाली आला. हातात चेंडूत आला पण झेल सुटला. पण त्याचा हा व्हिडीओ वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.

ऋतुराज गायकवाडचा झेल सोडला तेव्हा तो 39 धावसंख्येवर खेळत होता. त्यानंतर त्याने 33 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याला शिवम दुबेची उत्तम साथ मिळाली. त्यानेही अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सची मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.