MI vs KKR : कोलकात्याने मुंबई इंडियन्सला केलं स्पर्धेतून बाद, 24 धावांनी केला पराभव

| Updated on: May 03, 2024 | 11:53 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 51व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता उर्वरित तीन सामने नाममात्र असणार आहेत.

MI vs KKR : कोलकात्याने मुंबई इंडियन्सला केलं स्पर्धेतून बाद, 24 धावांनी केला पराभव
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या वाटेला पुन्हा एकदा पराभव आला आहे. मुंबई इंडियन्स नाणेफेकीचा कौल जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात सहज धावांचा पाठलाग होईल असं वाटत होतं. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स विजयासमोर 170 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही धावसंख्या तशी सोपी होती. मात्र मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नांगी टाकली. मोक्याच्या क्षणी विकेट्स गमवल्याने मुंबईचा संघ अडचणीत येत गेला आणि धावा आणि चेंडूतील अंतर वाढत गेलं. कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर मुंबई इंडियन्सला केलं पराभूत केलं आहे. मुंबई इंडियन्सचा संघ 145 धावा करू शकला. 24 धावांनी कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. यामुळे मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तसेच कोलकात्याने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे.

कोलकात्याचा डाव

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव अडखळत झाला. पहिल्याच षटकात गडी बाद झाल्याने टीम बॅकफूटवर गेली. नुवान तुषाराने पॉवर प्लेच्या दोन षटकात तीन गडी बाद केले. तर हार्दिक पांड्याने सुनील नरीनचा त्रिफळा उडवत धावांची गती थांबवली. पियुष चावलानेही वैयक्तिक पहिलं षटक टाकताना पहिल्या चेंडूवर रिंकू सिंहला बाद केलं.  वेंकटेश अय्यर आणि मनिष पांडेने संघासाठी मोक्याच्या क्षणी भागीदारी केली. दोघांनी मिळून 82 धावा ठोकल्या. तर वेंकटेश अय्यरने अर्धशतकी खेळी केली. डेथ ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवला. त्याने उर्वरित दोन षटकांमध्ये तीन गडी बाद केले. यासह कोलकात्याचा डाव 19.5 षटकात सर्वबाद 169 धावा केल्या आणि 170 धावा विजयासाठी दिल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा