IPL 2024 MI vs KKR Live Streaming : कोलकाता मुंबई विरुद्ध वानखेडेत भिडणार, पलटण विजयी ट्रॅकवर परतणार?

| Updated on: May 02, 2024 | 5:22 PM

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Streaming : मुंबई इंडियन्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान असणार आहे. कोण जिंकणार हा सामना? जाणून घ्या.

IPL 2024 MI vs KKR Live Streaming : कोलकाता मुंबई विरुद्ध वानखेडेत भिडणार, पलटण विजयी ट्रॅकवर परतणार?
mi vs kkr ipl,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर श्रेयस अय्यर याच्याकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. कोलकाताने या हंगामात आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला 10 पैकी 7 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या आणि कोलकाता दुसऱ्या स्थानी आहे. कोलकाताचा हा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पलटण विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी उत्सूक असणार आहे.

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना केव्हा?

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना शुक्रवारी 3 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना कुठे?

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलेसवर पाहता येईल.

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), श्रीकर भरत, मनीष पांडे, रहमानुउल्हला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरीन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजीब उर रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.