MI vs KKR : “…म्हणून किंमत मोजावी लागली”, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या बरंच काही बोलून गेला

| Updated on: May 04, 2024 | 12:31 AM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 51व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला 24 धावांनी पराभूत केलं. कोलकाता नाईट रायडर्सने 19.5 षटकात सर्वबाद 169 धावा केल्या आणि विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबईचा संघ फक्त 145 धावा करू शकला. या पराभवानंतर हार्दिक पांड्या चांगलाच संतापलेला दिसला.

MI vs KKR : ...म्हणून किंमत मोजावी लागली, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या बरंच काही बोलून गेला
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडिन्सला 24 धावांनी पराभवाचं पाणी पाजलं. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी जिंकली. तेव्हाच हा सामना मुंबई इंडियन्सच्या पारड्यात पडेल हे कळलं होतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. नाणेफेक जिंकून प्लेऑफमध्ये कोलकात्याला मागे ढकलण्यात गोलंदाजांना यश आलं. वेंकटेश अय्यर आणि मनिष पांडे यांनी 82 धावांची भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. तसंच तळाच्या फलंदाजांनी काही धावा जोडत ही धावसंख्या 169 पर्यंत नेली आणि विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सला 18.5 षटकात सर्वबाद फक्त 145 धावा करता आल्या. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता उर्वरित 3 सामन्यात विजय मिळवूनही काही फारसा फरक पडणार नाही. कारण टॉपचे चार 12 गुण आधीच मिळवून बसले आहे. त्यामुळे मुंबई हा स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. या पराभवाचं खापर हार्दिक पांड्याने फलंदाजांवर फोडलं आहे.

“विजयी धावांचा पाठलाग करताना योग्य ती भागीदारी करू शकलो नाही. मोक्याच्या क्षणी विकेट्स गमवत राहिलो. टी20 क्रिकेटमध्ये तुम्ही भागीदारी केली नाही तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत त्याला उत्तर देण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. पण सध्या फार काही सांगायचं नाही. गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या डावानंतर विकेट थोडी चांगली झाली आणि दव पडलं. आम्ही स्पर्धेत लढा देत राहू आणि काय चांगलं करता येईल ते करू. आम्हाला लढत राहणं गरजेचं आहे. हे मला स्वत:ला सांगणं गरजेचं आहे. रणांगण सोडून चालणार नाही. कठीण दिवस येतात. पण चांगले दिवसही येतात. हे सर्व काही आव्हानात्मक आहे. पण आव्हानं तुम्हाला आणखी चांगलं बनवतात.”, असं हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा