आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. एखादा मोठा चमत्कार घडला तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. पण हे सर्व मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना दिलासा देण्यासाठी बरं आहे. पण आता हे गणित काही शक्य नाही. त्यामुळे उर्वरित तीन सामने हे फक्त औपचारीक असणार आहेत. कारण हे तिन्ही सामने जिंकले तरी 12 गुण होतील आणि नेट रनरेट गाठणं कठीण आहे. मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याच्या हाती सोपवूनही काही खास करता आलं नाही, असा सूर क्रीडाप्रेमींचा आहे. गुजरात टायटन्सला दोनवेळा अंतिम फेरीत पोहोचवणार हार्दिक पांड्या मात्र फेल ठरला. मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्स तसं काही खास करू शकली नाही. आयपीएल 2023 मध्ये काठावर प्लेऑफमध्ये पोहोचली होती. त्यानंतर मुंबईचं आव्हान तिथेच संपुष्टात आलं. आता तर आठव्या नवव्या स्थानावर मुंबईची मजल राहिली आहे. कोलकात्याने पराभूत केल्याने हार्दिक पांड्या नाराज दिसला. त्याने सामन्यानंतर थोडक्यात पण बरंत काही बोलून गेला.
“खूप काही नाही. आता खूप सारे प्रश्न आहेत पण या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी काही काळ लागेल. आता फार काही बोलायचं नाही.”, अशा शब्दात हार्दिक पांड्याने नाराजी व्यक्त केली. खरं तर या सामन्यात हार्दिक पांड्याही काही खास करू शकला नाही. 3 चेंडूचा सामना करून 1 धाव केली आणि बाद झाला.मोक्याच्या क्षणी विकेट गमवल्याने मुंबईवरील दडपण वाढलं. त्यातून बाहेर पडणं कठीण झालं. एकदम कमी धावा असलेला सामना मुंबईने वानखेडे सारख्या मैदानात गमावला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील आठवा पराभव आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा