MI vs LSG : अर्जुन तेंडुलकरला अखेरच्या सामन्यात तरी संधी मिळणार का?

| Updated on: May 16, 2024 | 11:32 PM

IPL 2024 Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या हंगामातील आपला अखेरचा सामना हा वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहेत.

MI vs LSG : अर्जुन तेंडुलकरला अखेरच्या सामन्यात तरी संधी मिळणार का?
arjun tendulkar mi ipl 2024
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्सनंतर आता सनरायजर्स हैदराबाद या संघांनी क्वालिफाय केलंय. त्यामुळे आता एका जागेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यानंतर प्लेऑफमधील चौथा भिडू निश्चित होणार आहे. दरम्यान क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आता शुक्रवारी 17 मे रोजी होणाऱ्या सामन्याकडे लक्ष लागलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई आणि लखनऊ दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील 14 वा आणि अखेरचा सामना असणार आहे.

मुंबई आणि लखनऊ दोन्ही संघांचं आव्हान हे संपुष्टात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना औपचारिकता असणार आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांचा हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात तरी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या अर्जुन तेंडुलकर याला संधी देणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अर्जुनला या हंगामातील 13 पैकी एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अर्जुनला अखेरच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

अर्जुन तेंडुलकरची आयपीएल कारकीर्द

दरम्यान अर्जुनने आयपीएलच्या 16 व्या हंगामातून 16 एप्रिल रोजी केकेआर विरुद्ध पदार्पण केलं होतं. तर 25 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध अखेरचा सामान खेळला. अर्जुनने गेल्या हंगामातील एकूण 4 सामन्यांमध्ये 13 धावा आणि 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णा हो गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.