IPL 2024 MI vs LSG Live Streaming: लखनऊसाठी विजय महत्त्वाचा, पलटण शेवट गोड करणार का?

| Updated on: May 16, 2024 | 4:12 PM

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Streaming : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा हा अखेरचा सामना असणार आहे.

IPL 2024 MI vs LSG Live Streaming: लखनऊसाठी विजय महत्त्वाचा, पलटण शेवट गोड करणार का?
hardik pandya and krunal pandya mi vs lsg ipl 2024
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल याच्याकडे लखनऊ सुपर जायंट्सची धुरा असणार आहे. दोन्ही संघांची हा या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. तसेच दोन्ही संघांचा अखेरचा अर्थात 14 वा सामना असणार आहे. मुंबईचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर लखनऊसाठी अखेरची आशा म्हणून हा सामना महत्त्वाचा असणार आहे. एका बाजूला मुंबई विजय मिळवून शेवट गोड करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहेत. तसेच पलटणचा मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यात अखेरचा सामना हा या हंगामात 30 एप्रिल रोजी झाला होता. लखनऊने या सामन्यात मुंबईवर 4 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईच्या गोटात या पराभवाची कुठेतरी चिड निश्चित असणार आहे. मुंबईने या हंगामातील 13 पैकी अवघ्या 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर लखनऊने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघांपैकी कोण अखेरच्या सामन्यात विजय मिळवतं? याकडे लक्ष असणार आहे.

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना केव्हा?

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना 17 मे रोजी होणार आहे.

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना कुठे?

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे.

मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णा हो गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.