आयपीएलच्या 17 व्या मोसमाातील 67 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला. लखनऊने पलटणचा वानखेडे स्टेडियममध्ये धुव्वा उडवला. लखनऊने निकोलस पूरन आणि केएल राहुल या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईला 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 196 धावांपर्यंतच पोहचता आलं. लखनऊने या विजयासह या हंगामातील आपल्या मोहिमेचा शेवट विजय केला. लखनऊचा हा सातवा विजय ठरला. तर मुंबईचा हा 10 वा पराभव ठरला. मुंबईचं या हंगामातील प्रवास हा सर्वात शेवटी 10 व्या स्थानी संपला.
हार्दिक पंड्या याला रोहित शर्माला हटवून या हंगामात कर्णधार करण्यात आलं. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे हार्दिकला सुरुवातीपासून क्रिकेट चाहत्यांकडून टीका सहन करावी लागली. हार्दिकला या हंगामात ऑलराउंडर म्हणून बॅटिंग आणि बॉलिंगने छाप सोडता आली नाही. तसेच हार्दिक कर्णधार म्हणूनही अपयशी ठरला. मुंबईच्या शेवटच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्याने या हंगामातील प्रवासाबाबत प्रतिक्रिया दिली. पंड्याने सामन्यानंतर काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
“आयपीएलच्या या हंगामात आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळू शकलो नाहीत, त्याचे दुष्परिणाम आम्हाला संपूर्ण मोसमात भोगावे लागले. हे जग व्यवसायिक आहे, कधी चांगले दिवस येतील तर कधी वाईट. एक ग्रुप म्हणून आम्ही स्मार्ट क्रिकेट खेळू शकलो नाहीत जे निकालातून स्पष्ट झालं. आज रात्री मी काय चुकलं हे स्पष्ट सांगण्याचं घाईचं ठरेल”, असं हार्दिक पंड्या सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हणाला.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर्स : रोहित शर्मा, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
लखनऊ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर्स : नवीन-उल-हक, ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड आणि कृष्णप्पा गौथम.