रोहित शर्माने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियममध्ये चेसिंग करताना खणखणीत अर्धशतक ठोकलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने शानदार सुरुवात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे 40-45 मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. रोहितने काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा फटकेबाजीला सुरुवात करत अर्धशतक ठोकलं.
रोहितने सातव्या ओव्हरमध्ये सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 43 वं अर्धशतक ठरलं. रोहितने अवघ्या 28 चेंडूमध्ये हे अर्धशतक झळकावलं. रोहितने 189.29 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकार आणि 3 षटकारांच्या साहाय्याने अर्धशतक लगावलं. रोहितला गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. मात्र रोहितने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानात अर्धशत ठोकलं. रोहितने या अर्धशतकासह आपल्या चाहत्यांची मनं जिंकली.
रोहित अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाला. रोहितने आणखी जोरात फटकेबाजी करायला सुरुवात केली. मुंबईचा अखेरचा सामना असल्याने चाहत्यांना रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितला चाहत्यांची आशा पूर्ण करता आली नाही. रोहित 68 धावांवर आऊट झाला. रोहितने 38 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 178.95 च्या स्ट्राईक रेटने 68 धावा केल्या.
हिटमॅन सुपरहिट
THE GREATEST SIX HITTER – ROHIT SHARMA. 🔥🐐 pic.twitter.com/IxHHpLxec6
— Johns. (@CricCrazyJohns) May 17, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर्स : रोहित शर्मा, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
लखनऊ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर्स : नवीन-उल-हक, ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड आणि कृष्णप्पा गौथम.