आयपीएल 2024 स्पर्धेतील 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकताच कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. यावेळी केएल राहुलने संघातील बदलाबाबत आपलं म्हणणं मांडलं. क्विंटन डीकॉक आजच्या सामन्यात नसून त्याच्या जागी अर्शिन कुलकर्णीला संधी दिली आहे. अर्शिन कुलकर्णी प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही.मात्र दुसऱ्या डावात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरू शकतो. त्याला संधी मिळाली तर कसा खेळेल याची उत्सुकता लागून आहे. समोर जसप्रीत बुमराह, पांड्या, कोएत्झीसारखे गोलंदाज असणार आहेत. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये अर्शिनने फलंदाजीचं दर्शन घडवलं होतं. तसेच आक्रमक खेळी करत विरोधी संघांना सळो की पळो करून सोडलं होतं. लखनौ सुपर जायंट्सने त्याला लिलावात 20 लाखांच्या बेस प्राईसवर घेतलं होतं.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसते. त्यांच्या फलंदाजांवर दडपण आणायचे आहे. तसेच पाठलाग करायचा आहे . आम्ही शक्य तितकं संघात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करू. बाहेर येऊन दाखवण्याची गरज आहे. आम्ही काही चांगले विजय मिळवले आहेत. संघात काही बदल आहेत. क्विंटन डीकॉक ऐवजी अर्शीन कुलकर्णी संघात आहेत. मयंक पण परत संघात आला आहे. त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली आहे, त्याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. मी फिजिओ आणि मेडिकल टीमचा आभारी आहे आहे. मयंक खेळण्यास उत्सुक आहे. दुखापत झाली होती हे त्याच्या डोक्यातून काढणं महत्त्वाचे आहे.”
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह. इम्पॅक्ट प्लेयर्स: नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, शम्स मुलानी
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (डब्ल्यू/सी), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव. इम्पॅक्ट प्लेयर्स : अर्शीन कुलकर्णी, मणिमारन सिद्धार्थ, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग, प्रेरक मंकड.